डॉ.गीता मांजरेकर यांनी मराठी साहित्य या विषयांचे अध्ययन करून चरित्रात्मक नाटक या विषयातील संशोधनाधारे पीएच.डी.ही पदवी मिळवली.त्यानंतर ३६ वर्षं मराठी भाषा आणि साहित्य या विषयांचे त्या अध्यापन करत होत्या.त्यांची काही मराठी साहित्य संशोधनपर व समीक्षात्मक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.इंग्रजी अभिजात साहित्य वाचन आणि भाषांतर यातही त्यांना स्वारस्य आहे.